top of page
लाखनवाडी

                                            विदर्भामध्ये लाखनवाडी हे ठिकाण महाराष्ट्रातील अमरावती

                                           जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यामध्ये चांदूरबाजार पासून

                                           अंदाजे  २९ किलोमीटर अंतरावर आहे. श्री गुणवंत महाराजांच्या

                                          मुर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून या परिसरातील अनेक भक्त

                                          बांधव व दर्शनार्थिंची येजा सुरू असते. अनेक भाविक लोक आवर्जून

                                          येथे येऊन भजन कीर्तनांदि कार्यक्रम स्वतःहून साजरा करतात. दरवर्षी येथे जयंती उत्सव (१९ सप्टेंबर) व पुण्यतिथी उत्सव (२ ऑक्टोबर) फार मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या जातो व फार मोठी यात्रा भरते.  गेल्या काही वर्षापासून  अमरावती, अचलपूर, परतवाडा, चां.बाजार, व इतर शहरातून तसेच या परिसरातील वनवासी व लाखो भाविक लोक मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी येतात. त्याशिवाय ईतर दिवशी ठिकठिकाणाहून हजारो भक्तगण येथे येऊन भंडारा करतात. भंडारा लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता तो सर्वजण प्रसाद म्हणून घेतात. येथे येऊन भक्तगण दर्शन, भजन, पूजन आणि अर्चा करतात. 
समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, विकासाच्या योजनाबरोबरच धार्मिक जागरणाचे विविध उपक्रम हे संस्थान करत आहे. संस्थानस वेगळे उत्पन्न नाही. देणगीरूपाने जो पैसा मिळतो त्या पैशातून वर्षभराचे धार्मिक खर्च पंच कमिटी करते. याच माध्यमातून धर्मजागरणाचा एक यशस्वी प्रयोग संस्थेने केला आहे.


ह्या गावाची लोकसंख्या अंदाजे - २५ हजाराच्या जवळपास आहे. परतवाडा शहरा पासून लाखनवाडी हे गाव २० कि.मी. अंतरावर आहे.

लाखनवाडी जाण्याकरीता मार्ग :

१. रेल्वे स्थानकावर्रून : रेल्वेने जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे अचलपूर रेल्वे स्थानकावर यावे. येथून परतवाडा या गावी रिक्षेने अथवा पायी यावे, येथून लाखनवाडी जाण्याकरीता एस.टी अथवा खाजगी वाहने उपलब्ध आहे.
२. एस.टीने : परतवाडा ते लाखनवाडी अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २० कि.मी. भरते.
४. एस.टीने : चांदूरबाजार ते लाखनवाडी अशी बससेवा तसेच खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. हे अंतर सुमारे ४५ कि.मी. भरते.


गोपालन

संस्थेने गाईच्या स्थानिक जातीचे संवर्धन व्हावे या हेतूने गोपालनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गाईसाठी उत्तम गोठा बांधला आहे. सध्या गाई, वासरे बैल मिळून जवळपास २० जनावरे आहेत. गोठयातील् शेणाचा वापर करून एक गोबरगॅस प्लांट बांधण्याचा संकल्प आहे. त्यामुळे इंधनखर्चात कपात करणे साध्य होईल. अधिक उत्पन्न वाढवता यावे या करीता शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत इ. खताचे उत्पादनही केंद्रावर करता येईल. यातून काहीजणांना रोजगार उपलब्ध होतील.
 
निधी संकलन
आपण देणगी दिल्या म्हणून याचा फार चांगला उपयोग होत आहे. सरकारी केंद्राप्रमाणेच विविध उपक्रम संस्थेने चालू केले आहेत. प्रतिवर्षी एका उपक्रमासाठी सहकार्य करण्याचा मनोदय आहे.
सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी खालीलप्रमाणे निधि संकलन केले जाते.

  • केंद्र संचालन निधी - रु १०००/- , रु ५००/- हा निधी बँकेत कायमठेव म्हणून ठेवला जातो त्याच्या व्याजातून अत्यावश्यक वस्तू , केंद्राचा सार्वजनिक उत्सव व इतर बांधकामासाठी खर्च केला जातो.

 विशेष सहकार्य
संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती येथे दिली आहे. समाजाच्या विकासासाठी आणखी अनेक उपक्रम करावयाचे आहेत. संस्थेने आजपर्यंत केलेली कामे आपल्याच सहकार्याने केली आहेत. असेच सहकार्य यापुढेही करावे व अनेकांना सहकर्यासाठी प्रवृत्त करावे हेच नम्र विनंती.

संपर्क पत्ता

श्री गुणवंत महाराज संस्थान
लाखनवाडी,
ता. चांदूरबाजार , जि. अमरावती .

© 2023 by श्री संत गुणवंत महाराज Proudly created with Wix.com

bottom of page