अचलपूर
श्री गुणवंत महाराजांचे जागृत देवस्थान म्हणून ह्या देवस्थानाची फार
ख्याती आहे. श्री गुणवंत महाराजांचे प्रसादित श्री अचलपूर (एस.टी)
मोटार-थांब्यापासून अवघ्या एका किलोमीटर अंतरावर श्री गुणवंत
महाराजाचे मंदिर आहे. हे मंदिर श्री गुणवंत नगर (ठिक्करीपूरा) येथे
आहे. श्री चे देवालय पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहे. देवाच्या मूर्तीसमोर दहा फुटी ऐसपैस असा सभामंडप आहे. त्यापुढे विस्तृत पटांगण आहे. देवालयाचे द्वार पूर्वभिमुख आहे. सभामंडपतील श्री ची मूर्ती सुमारे साडेपाच फूटाची भव्य, सुंदर आणि रेखीव अशी आहे. मूर्तीच्या डोक्यावर नागाची फणा आहे. सभामंडपानंतर मुख्य गाभारा लागतो. गाभाऱ्यातील महाराजांची मूर्ती अत्यंत रमणीय आशी आहे. मूर्ती नित्यपूजेसाठी स्थापन करण्यात आली आहे. भक्तमंडळीनी मिळून ह्या देवालयात काही फेरफार करून त्याची भव्यता आणि शोभा अधिक वाढविली. देवालयाच्या आवाराबाहेर सभोवताली जवळच किल्ल्याच्या संरक्षणार्थ बांधण्यात आलेला पक्का तट आहे. तटाचे आवार बरेच भव्य आहे. २०० वर्षे जुना असलेला हा तट अजूनही सुस्थितीत राहिलेला आहे.
दरवर्षी (१९ सप्टेंबर) जयंतीच्या दिवशी वर्धापनदिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो. त्या दिवशी प्रामुख्याने महाराजांच्या प्रतिमेची पालखीमधून मिरवणूक काढ्यत येतो. या निमित्ताने गावातील सर्वजण एकत्र येतात. उत्तम आरास, विविध कार्यक्रम, ग्रामस्वच्छता इ. कार्यक्रम करतात आणि भंडारा करतात. उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनचे कार्य संस्थेचे कार्यकर्ते करत असतात. या प्रयत्नातून अनेक बांधव प्रेरित झाले आहे. जयंतीच्या दिवशी ठिकठिकाणाहून हजारो भक्तगण येथे येऊन भंडारा करतात. भंडारा लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता तो सर्वजण प्रसाद घेतात. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी, फराळ व भेट वस्तू शहरातून गोळा केला जातात. व त्याला शहरी बांधव आनंदाने व तत्परतेने प्रतिसाद देतात असा अनुभव आहे.
निधी संकलन
केंद्र संचालन निधी - रु १०००/- , रु ५००/- हा निधी बँकेत कायमठेव म्हणून ठेवला जातो त्याच्या व्याजातून अत्यावश्यक वस्तू , केंद्राचा सार्वजनिक उत्सव व इतर बांधकामासाठी खर्च केला जातो.
विशेष सहकार्य
संस्थेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती येथे दिली आहे. समाजाच्या विकासासाठी आणखी अनेक उपक्रम करावयाचे आहेत. संस्थेने आजपर्यंत केलेली कामे आपल्याच सहकार्याने केली आहेत. असेच सहकार्य यापुढेही करावे व अनेकांना सहकर्यासाठी प्रवृत्त करावे हेच नम्र विनंती.
संपर्क पत्ता
श्री गुणवंत महाराज संस्थान
गुणवंत नगर (ठिक्करीपूरा)
अचलपूर
ता. अचलपूर , जि. अमरावती ,