top of page

नारायणपूर
                             महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूरतालुक्यामध्ये

                              अचलपूर बस स्थानकापासून १० किलोमीटर तर परतवाडा बस

                               स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

                      परतवाडा–अमरावती मार्गावरिल विदर्भ मिल थांब्यापासून नारायणपूर फाटा आहे. नारायणपूर मार्गे जात असतांना डाव्या हातावर मंदिराकडे जाण्याकरिता एक पायवाट आहे येथून १५  मिनीटात मंदिरात पोहचता येते.
तसेच परतवाडा - कविठा मार्गे गेले असता उजव्या हातावर मंदिराकडे जाण्याकरिता एक फाटा आहे येथून १५ मिनीटात मंदिरात पोहचता येते.
श्री गुणवंत महाराजांचे हे ईच्छा स्थान आहे. येथे एक सुंदर वास्तू बांधण्यात आली व त्यात एका सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना दि. १९ सप्टेंबर १९९४ या रोजी करण्यात आली.  मूर्ती अगदी रेखीव आहे, मूर्तीचे तोंड पच्शिम दिशेला आहे. मूर्ती मनोहर आहे. या मंदिराचे तोंड सुद्धा पच्शिम मूखी आहे.पच देवाच्या गाभाऱ्यापुढे आठ फूट रुंद असा ऐसपैस चौरस सभामंडप आहे.


ठिकठिकाणाहून हजारो भक्तगण येथे येऊन दर्शन, भजन, पूजन, अर्चा करतात आणि भंडारा करतात. भंडारा लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता तो सर्वजण प्रसाद घेतात.
येथून श्री गुणवंत महाराजांच्या मुख्य मंदिरात (लाखनवाडी) जाण्याकरिता  कविठा – लाखनवाडी मार्गे

जाता येते. या मंदिरापासून लाखनवाडी हे गाव ९ कि.मी. अंतरावर आहे. तर कविठा – लाखनवाडी हे अंतर अंतर सुमारे ५ कि.मी. भरते. येथून लाखनवाडी जाण्याकरीता एस.टी अथवा खाजगी वाहने उपल्ब्ध असतात.

© 2023 by श्री संत गुणवंत महाराज Proudly created with Wix.com

bottom of page